Psalms 93

1परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे;
परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे.
जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही.
2तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे;
तू सर्वकाळापासून आहेस.

3हे परमेश्वरा, महासागरानी आवाज उंचावला आहे;

आपला आवाज उंचावला आहे,
महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात.
4बहुत जलांच्या, महासागराच्या प्रचंड
लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला
परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे.

तुझे नियम अतिसत्य आहेत;

हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता
सदासर्वकाळ शोभते.
5

Copyright information for MarULB